Loading...
मुख्य कार्यक्रम

आरती केंद्र

हिंदू समाजामध्ये समरसतेचे वातावरण तयार व्हावे व हिंदू संस्कारांचे पालन व्हावे म्हणून मंदिरात साप्ताहिक आरती ,दैनिक सत्संग, भजन ,किर्तन असे कार्यक्रम केले जातात.

आपले मंदिर आपली शक्ती

दुर्गम व जनजाती क्षेत्रात मारुती मूर्तींची स्थापना करणे. मालेगाव जिल्ह्यात दुर्गम व जनजाती क्षेत्रातील पाड्यात दर वर्षी गणेश मूर्ती दिल्या जातात. तसेच एका रथावर रामायांचा देखावा उभा करून रामायण दाखविण्याचे कार्यक्रम केले जातात.

जागरण यात्रा व जयंती उत्सव

आपल्या समाज बांधवांना त्यांच्या कुलदेवतेचे दर्शन व्हावे व हिंदू धर्माविषयी श्रद्धा सतत जागृत राहावी म्हणून जागरण यात्रांचे आयोजन केले जाते. महापुरुषांचे जयंती उत्सव साजरे केले जातात.

संत प्रवास

धर्म रक्षण धर्म पालन धर्म कि जय गाऊया ,

ऋषी मुनींच्या साधु संतांच्याच मार्गे जाऊया ||

हिंदू धर्मावर वर्षानुवर्षे अनेक आघात होऊन सुद्धा हिंदू धर्म टिकून राहिला याचे कारण वेळोवेळी हिंदूधर्माचे रक्षण करण्यासाठी अनेक संत व महापुरुष होऊन गेले. संतांचा हाच आदर्श ठेवून 'संत प्रवास' हा उपक्रम सुरु आहे. हिंदू धर्माविषयी श्रद्धा जागृत व्हावी व हिंदूसंस्कृतीचे व संस्कारांचे पालन व्हावे म्हणून संतांच्या प्रवासाची योजना कार्यरत आहे, संत घराघरात जाऊन दीप प्रज्वलन करणे , घरातील सर्वांच्या गळ्यात रुद्राक्ष घालणे ,आरती करणे, हिंदू धर्माविषयी श्रद्धा जागृत करणे, प्रवासात त्या भागातील समाजातील संतांनी व महापुरुषांनी हिंदू धर्मासाठी केलेलं योगदान व बलिदानाविषयी माहिती सांगून अस्मिता जागृत करतात, संत हिंदू धर्माविषयी श्रद्धाभाव दृढ करण्याचे कार्य करतात.

भारत माता पूजन

आपण आपल्या देशाला 'माते' समान मानतो म्हणून 'प्रजासत्ताक दिन' या दिवशी ठिकठिकाणी भारतमाता पुजनाचे आयोजन केले जाते. स्वतंत्र भारत हा सुरक्षित आणि सम्रद्ध भारत बनावा या विचार आणि भावनाने समाजाला पुन्हा उभे करण्याचा संकल्प केला जातो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजात समरसता व राष्ट्राविषयी श्रद्धा भाव जागृत करण्याचा प्रयत्न केला जातो.

धर्मरक्षा दिन

धर्म रक्षणाच्या हेतूने बलिदान केलेल्या महापुरुषांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 'धर्मरक्षा दिन' हा अनिवार्य कार्यक्रमांच्या सूचीतील एक कार्यक्रम आहे. छत्रपती शिवरायांनी देव, देश आणि धर्मासाठी कसे जगायचे शिकवले तर त्यांच्याच कार्यास स्मरून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या प्राणापेक्षा प्रिय असलेल्या धर्मासाठी कसे मरायचे हे आपले हृदयद्रावक बलिदानातून शिकवले. छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी बलिदान केले तो दिवस म्हणजेच मृत्युंजय अमावास्या (कृष्ण पक्ष फाल्गुन) हा दिवस 'धर्मरक्षा दिन' म्हणून पाळला जातो.

मृत्यूसही न डरले मनी धर्मवीर । फुटले स्वनेत्र, तुटले जरी जीभ शीर।।

दुर्दांत दाहक ज्वलंत समाज व्हावा। म्हणुनी उरात धरुया शिवसिंहछावा।।

धर्मरक्षा बंधन

हिंदू समाजाचा परंपरागत 'रक्षा बंधन' हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेस साजरा केला जातो. या निमित्ताने हिंदू समाजामध्ये हिंदू धर्माचे दृढिकरण व्हावे यासाठी धर्मारक्षा बंधनाचा कार्यक्रम साजरा केला जातो. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्वबांधवांच्या माध्यमातून सर्व हिंदू बंधूभगिनींना आणि आबाल वृद्धजनांना धर्म रक्षा सूत्र बांधले जाते.

पूजा प्रशिक्षण

धर्म जागरण ट्रस्ट वर्ष 2012 पासून दर वर्षी जनजाती क्षेत्रातील शिक्षार्थीचे पूजा प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले जाते. दुर्गम व जनजाती क्षेत्रात पुरोहित मिळत नसल्यामुळे हिंदूसंस्कार केले जात नाहीत असे लक्षात आल्यामुळे हा उपक्रम सुरु केला आहे. शिक्षार्थी प्रशिक्षणाचा समाजात उपयोग करताना दिसत आहेत.

साधू स्वाध्याय संगम

ज्या संतानी 'संतप्रवास' या उपक्रमात भाग घेतला आहे त्यांचे एकत्रीकरण केले जाते. या एकदिवसीय अभ्यासवर्गात उपक्रमाची गुणवत्ता वाढविण्याविषयी चर्चा केली जाते, संतांचे प्रवासातील अनुभव कथन केले जातात व धर्मजागरण हा विषय प्रभावीपणे समाजात कसा पोहचवता येईल या विषयी चर्चा केली जाते. आगामी कार्यक्रमाची दिशा व काही नवीन विषय सुद्धा अभ्यास वर्गात घेतले जातात. संत प्रवासाविषयी चे अभिप्राय संतांकडून घेतले जातात.

अभ्यास वर्ग

कार्य विस्तारासाठी कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण व अभ्यास वर्ग घेतले जातात. या अभ्यास वर्गात कार्यकर्त्यांनी केलेला प्रवास, जिल्हा व तालुक्याची संघटनात्मक स्थिती, नवीन नियुक्ती , झालेल्या कार्यक्रमांचे वृत्त व आगामी कार्यक्रमांचे नियोजन तसेच धर्म रक्षा समिती गठन ,काही विशेष घटना याचा अंतर्भाव केला जातो.